Monday, April 13, 2020

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ


कधी या विषयावर लिहिणार असा विचार केला नव्हता.पण बाहेर सगळीच जागतिक परिस्थिती बदललेली असताना एक विचार काय मोठी गोष्ट आहे असं म्हणतात अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांत जास्त घाबरतो खरंच का?

एका सूक्ष्म कणा पेक्षाही लहान असं काहीतरी आपल्या आयुष्यात शिरत आणी सगळं आयुष्यच बदलून जात. काय गंमत आहे न! एका ठिकाणी जेव्हा आपल्याला आपली संकटे जगापेक्षा ही मोठी वाटत असताना ती या आलेल्या संकटाला सामोर नमशेष झाली.
गेले किती दिवस आपण घरीच आहोत. प्रत्येकाचं आपलं आपलं असं आयुष्य चालू आहे. मला आपण या काळात आपल्याला काय उमगलं, काय शिकलो, माणसं जवळ आली, प्रदूषण कमी झालं या सगळ्या चर्चेच्या विषयावर जराही माझं मत मांडायचं नाही आहे.
मला बोलायचं आहे माणूस या विषयावर. मी माणूस म्हणून कुठे कमी पडते का? याचा आढावा घेणाऱ्या काही बाबींवर. म्हणतात लोक त्यांची कर्तव्य विसरतात आणि हक्क लक्षात ठेवतात. पण माहिती आहे का कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलवायची असते. ज्याच्या कडून अपेक्षा असतात तो पूर्ण करतोच अस नाही, आणि अपेक्षा नसतानी जो काही करतो त्याचं आश्चर्य वाटत असं ही नाही.

दारिद्र्याचे दोन दिवस,
आज पोटाला चिमटा तर उद्या चतकोर भाकर...
फाटलेला तो मळकट सदरा आणि पाठीवर ओळभर जत्रा...
कधी मंदिरात तर कधी फुटपाथवर वर स्वारी,
तरी जगावर वजन पडत भारी...
आज या भारी वजनाचा भार सांभाळण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. मला आठवतं शाळेत असताना आम्हाला एक धडा होता भारत माझा देश आहे त्याचा तात्पर्य असं होतो की गोष्ट माझी म्हटल्यावर आपण त्याची जेवढी काळजी घेतो तशी आपली म्हणल्या वर घेत नाही. जसं अंगण माझं म्हणून मी त्याला साफ ठेवते पण रोड आपला म्हणून मी त्याला घाण करते. म्हणून आपल्या प्रतिज्ञा मध्ये म्हटलं जातं भारत माझा देश आहे. अपेक्षा फक्त एवढी की  जशी घराची काळजी घेतो तशी देशाचीही घ्यावी ज्याला आपल्या पद्धतीने जशी जमेल तशी. अंदाजा वरून आपण एखाद्या व्यक्तीचं मन ठरवू शकत नाही कारण थांबलेल्या समुद्र हा जास्त खोल असतो.

जेव्हा ही जगावर कोणत्या प्रकारच संकट येतं त्याचा झटका हा फक्त गरिबांनाच बसता आणि बाकी लोकांना लागते ती केवळ आस. मग त्यांच्यासाठी उपायोजना, पॅकेज आणि बरच काही. पण मी माणूस म्हणून जगत असतानी माझी जबाबदारी टॅक्स भरला की संपली एवढी आहे का? माझ्या दिलेल्या एक छोट्या मदतीने मी गरीब किंवा घेणारा श्रीमंत होणार आहे का? अगदी च नाही. फक्त त्याची भूक  भागेल व अंतरात्मा सुखावेल शेवटी मिळालं पुण्य ही तुमच्याच तर पदरात पडेल. मदत करतांनी विचार येतो च की हात-पाय तर सक्षम आहे काम धंदा का करत नाही? मुले सरकारी शाळेत का जात नाही? आणि ते अगदी बरोबर ही आहे. सत्य आहे पण आज लोक डाऊन'मुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे काम करणारा ही काम करू शकत नाही आहे, कमावू शकत नाही, भिकारी भिक सुद्धा मागू शकत नाही. त्यांना नाही कळत भविष्यासाठी तरतूद कशी करावी लागते ती लोक रोज कमाउन पोट भरणारी असतात, मग  मी माझ्या विचारांन साठी आज त्यांना उपाशी मरतांनी बघायचं का. ते उपाशी आहेत लाचार नाही.

आपण आपली मत मांडूयात, त्यांना बोलूया, सांगू या, कादाचीत आज पोटाला चिमटा बसल्यावर त्यांनाही कळलं असेल कि उद्यासाठी हि राखुन ठेवाव लागत पण हे आता नको, खरच नको. मंदिरावर नेहमीच बोट  उचललं गेलं की त्यांना एवढी वर्गणी येते ती का दिली जात नाही. आता तर ती ही शंका दूर झाली त्यांनीसुद्धा देवापेक्षा माणसाची किंमत केली. आपणही आपला मोलाचा वाटा देऊया जमेल तेवढी आणि तशी मदत गरजू  यांना करू या. शेवटी माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर तो कसाही करतो आणि नसेल करायची तर तो कारण शोधतो ती नंतर तुमच्या चेहर्‍यावरचे समाधान आणि घेणाऱ्या च्या चेहर्‍या वरील आनंद तुम्हाला सुखावेल. अजून काय पाहिजे असतं एखाद्याला आयुष्यात.

समाजातला एक वर्ग डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी यंत्रणा आपली कर्तव्य जबाबदार रित्यापार पाडत आहे मग समाजाचा एक घटक म्हणून मी का नको? हाही काळ ओसळेल एक नवीन पहाट उगवेल तेव्हा किंमत फक्त माणसातील माणुसकी ची केली जाईल आणि आपण त्याचा एक छोटासा का होईना पण भाग असू.

विचारांच्या समुद्रात बुडताना वास्तव  याच लाईफ जॅकेट घालावं. आभासी जगात जगताना सत्याचा शोध घेणे शिकावं. वाहणाऱ्या प्रत्येक वाऱ्याबरोबर आपल्या दुःख झटकावं, आणि पडणार्‍या प्रत्येक पावसाबरोबर डोळ्यातलं पाणी लपवाव.येणाऱ्या प्रत्येक वादळाचा हसत हसत  सामना करावा. एक माणूस म्हणून जगताना दुसऱ्याला सहकार्य कराव.
शेवटी
 हीच ती योग्य वेळ लाहाणपणाचे संस्कार आचरणात आणण्याचे.अखेर थेंबे थेंब तळे साचे.
# Karke dekho accha lagta hai



8 comments:

  1. गाव हा विश्वाचा नकाशा
    गावावरून देशाची परीक्षा
    गावची भंगता अवदसा
    येई देशा!
    वंदनीय तुकडोची महाराजांच्या विचाराप्रमाणेच तू तुझे शब्द मांडलेत,खरंच खूप छान.भाग्यश्री😊

    ReplyDelete
  2. The best way to not feel hopeless is to get up and do something. Don’t wait for good things to happen to you. If you go out and make some good things happen, you will fill the world with hope, you will fill yourself with hope.
    - Barack Obama

    The Great Thought you expressed Dear! 😊👍

    ReplyDelete
  3. खूप छान भाग्या...

    ReplyDelete

MELODY OF ACCOUNTABILITY

"Life's journey is a cosmic dance of choices and consequences, where you shape your destiny—one step at a time. 'You are respon...